राजकीय
मोठी बातमी! ठाकरे भाजपला झटका देणार?

- लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. मुंबईतील विविध लोकसभा मतदारसंघाचा पक्षांकडून आढावा घेतला जात आहे. एकीकडे भाजपा आणि शिंदे गटात जागा वाटपावरुन चर्चा सुरू असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठी मोठा प्लान तयार केला आहे.
शिंदे गटासह भाजपाला लोकसभेत पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी उद्धव आज उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या पदाधिकाऱ्यांना मातोश्री येथे बैठकीसाठी बोलण्यात आले आहे.
या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे आज मातोश्रीवरील बैठकीत या दोन्ही जागा आपल्याकडे कशा येतील, याबाबत ठाकरे गटाकडून प्लान आखला जाणार आहे.
ठाण्यात ठाकरे गटाकडे राजन विचारे नावाचा हुकुमी एक्का आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांना या जागेवर विजय मिळवणे खूप कठीण जाईल, असे भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही जागा शिंदे गटाने भाजपाला सोडावी, असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आग्रह आहे.
त्यामुळे ठाण्यात नेमके काय होणार? याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे, उत्तर मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघात सध्या गोपाल शेट्टी, तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मनोज कोटक हे खासदार आहेत. त्यामुळे मुंबईतील या दोन लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचे विशेष लक्ष असणार आहे.



