देश - विदेश

ब्रेकिंग! पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवादी ठार

  • जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जवळच्या भागामध्ये असलेल्या दाछीगाम फॉरेस्ट क्षेत्रामध्ये आज भारतीय लष्कराचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. ऑपरेशन महादेव अंतर्गत ही कारवाई सुरू होती. त्यामध्ये गोळीबाराचा आवाज झाला. त्यात तीन दहशतवादी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे दुसऱ्या देशातील असल्याचे देखील बोलले जात आहे. तसेच ते पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी असल्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
  • जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांचे हे संयुक्त अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत सुरक्षा दलाने दाछीगाम फॉरेस्ट क्षेत्रात कोम्बिंग ऑपरेशन केले. हा भाग श्रीनगरच्या त्राल या भागाला जोडलेला आहे. डोंगराळ भाग आहे. त्यामुळे भारतीय लष्कराचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
  • दरम्यान याबाबत सुरक्षा एजन्सीजने हे दहशतवादी असल्याची शंका उपस्थित केली आहे. तसेच दाछीगाम फॉरेस्ट क्षेत्र दहशतवाद्यांचे मुख्य ठिकाण मानले जाते. तसेच त्यांनी नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली असल्याचे सांगितले. या अगोदर देखील भारतीय लष्कराने दाछीगाम फॉरेस्ट क्षेत्रात दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले होते.

Related Articles

Back to top button