क्राईम
बीडमधील हत्येप्रकरणी मोठी अपडेट; आणखी दोन मुख्य आरोपींना अटक

- सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील चार आरोपींना अटक केली होती. तर, तीन आरोपी फरार होते. मात्र, देशमुख प्रकरणातील दोन फरार आरोपींना पोलिसांना पुण्यात अटक केल्याची माहिती मिळत आहे. यात मुख्य सूत्रधार सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला अटक केली आहे. तर, कृष्णा आंधळे हा फरार आहे. देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
- अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. देशमुख हत्या प्रकरणात घुले हाच मुख्य आरोपी असल्याचे बोलले जात होते. मारहाणीत देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर तपासाची मागणी होत होती. एसआयटी, सीआयडी तपास करत असताना अखेर दोघांना अटक करण्यात यश आले आहे. एक आरोपी मात्र फरार आहे. दरम्यान हत्येच्या दिवशी देशमुख यांचे सतत लोकेशन देणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आल्याचे समजत आहे.