क्राईम

ब्रेकिंग! पुण्यात फिल्मी स्टाईलने अपहरणाचा थरार

  • आयपीएल क्रिकेट सामन्यावरील सट्टेबाजीत हरलेले सहा लाख रुपये परत घेण्यासाठी सट्टेबाजांनी एका गॅरेज चालकाला किडनॅप केले होते. पुण्यातील नगर रस्त्यावर ही घटना घडली होती. पोलिसांनी या घटनेची लगेच दखल घेत आरोपींना सोलापुरातून अटक केली आहे,
    नागेश एलमल्ली, आकाश बिराजदार (दोघे रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गॅरेज चालकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
    फिर्यादीच्या पतीचे गॅरेज आहे. पती आयपीएल क्रिकेट सामन्यावरील सट्टेबाजीत सुमारे सहा लाख रुपये गमावून बसला होता. दरम्यान, सट्टेबाज एलमल्ली, बिराजदार हे पैसे देण्यासाठी तगादा लावत होते. परंतु, त्याने पैसे दिले नाही. यामुळे सट्टेबाजांनी पहाटेच्या सुमारास चालकाला किडनॅप केले. हरलेले पैसे परत दिले नाही तर जीवे मारण्याची धमकीसुद्धा त्यांनी दिली होती.तसेच सट्टेबाजांनी गॅरेज मालकाच्या पत्नीला फोन करत सुमारे १० लाख रुपयांची मागणी केली. 
  1. घाबरल्याने त्यांनी लोणीकंद पोलीस ठाणे गाठत पतीच्या अपहरणाची तक्रार दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून पथके तयार केली. आरोपींनी गॅरेज चालकाचे अपहरण करुन त्याला सोलापूरमध्ये डांबून ठेवले होते. ही माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली. त्यांनी सोलापूरला पथक पाठवून गॅरेज चालकाची सट्टेबाजांच्या तावडीतून सुटका केली. तसेच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button