राजकीय

ब्रेकिंग! उद्धव ठाकरे मोठ्या निर्णयाच्या तयारीत

  1. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना ठाकरे हे पुढील लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. 
  2. त्यासाठी ठाकरे गटासह महाविकास आघाडीत ( मविआ ) जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राऊत यांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवल्यास त्यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असेल.
    राऊत हे राज्यसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. ईशान्य मुंबईत भाजपाचे मनोज कोटक विरुद्ध राऊत असा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी आधी लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवावी आणि मग आमच्यावर टीका करावी, अशी टीका शिंदे गटाकडून कायम केली जात आहे. राऊत प्रत्यक्षात लोकसभेच्या मैदानात उतरल्यास शिंदे गटाला एक प्रकारे उत्तर मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.
    संपूर्ण देशभरात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आहे. ” इंडिया” चा हा फॉर्म्युला सर्वच घटक पक्षांना बंधनकारक आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडूनही एकास एक उमेदवार देण्यावर भर दिला जात आहे. 
  3. त्याचाच एक भाग म्हणून राऊत यांनाच थेट निवडणुकीच्या मैदानात उतरवणार आहे. दरम्यान, ठाकरे गटातील १३ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे दिग्गज आणि मातब्बर नेत्यांची कमतरता आहे. त्यामुळेही ठाकरे गटाकडून राऊत यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button