राजकीय
ब्रेकिंग! शरद पवार यांनाच फोडण्याचा होता प्लॅन

राष्ट्रावादीच्या फुटीनंतर दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या दोन्ही गटाच्या आरोप-प्रत्यारोपाच्या दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजितदादा गट आणि शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट झाली.
याच दरम्यान, अजितदादा गटाने शरद पवारांनाच फोडण्याचा राजकीय प्लॅन आखला होता, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
अजितदादा यांनी शिंदे सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. दादासोबत ९ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, अजितदादा यांनी काल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बैठकीलाही हजेरी लावली. या बैठकीला अजितदादा यांच्यासहित खासदार प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते.
दरम्यान, दिल्लीतील एनडीएच्या या बैठकीला शरद पवार यांनाही आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला पवार यांचा विरोध होता. बैठकीसाठी २ दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना भेटून विनंती करत होते. पण पवार विरोधावर ठाम होते. राष्ट्रवादीच्या आमदार माफी मागण्यासाठी नसून दिल्लीतील बैठकीसाठी शरद पवारांना आग्रह करत होते, अशीही माहिती आहे.
दरम्यान, अजितदादा हे बंड दिवाळीनंतर करणार होते. मात्र, दिवाळीआधीच अजितदादा यांनी बंड केले. कारण महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेतही अजितदादा जास्त बोलत नव्हते. विशेष म्हणजे या सभांना जनतेतून प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे भाजप हायकमांडने अजितदादा यांना वेळेआधीच बंड करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.