महाराष्ट्र

खुशखबर! राज्यातून कोरोना हद्दपार ! नववर्ष जल्लोषात साजरे करा; आरोग्यमंत्री

जगात एकीकडे कोरोनाचा उद्रेक होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. देशातही केंद्र पातळीवरून अनेक सूचना राज्यांना देण्यात आले आहे. असे असताना राज्याचे आरोग्यमंत्री यांनी मात्र, निर्धास्त राहण्याचा सल्ला दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी येणारे नववर्ष हे जल्लोषात साजरे करण्याचा सल्ला राज्यातील जनतेला दिला आहे.
सावंत यांच्या हस्ते पुण्यात पिंपरी चिंचवड येथे अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.
राज्यातील नागरिकांची रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. त्यामुळे नागरिकांनी येणाऱ्या नव वर्षांचा आनंद घ्यावा. प्रत्येक सण आणि सुट्या जल्लोषात साजरे करा, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. आपल्याला धोका पत्कारायचा नाही, त्यामुळे खबरदारी घेतली जात असून कोरोना नियमांचे पालन करत नवीन वर्ष साजरे करा, असे देखील सावंत म्हणाले.

Related Articles

Back to top button