देश - विदेश
वाहतूकीचा हा नवा नियम पाळा ; अन्यथा बसेल तुम्हाला दणका

दुचाकी चालवताना एखाद्या वाहतूक पोलीसाने आपल्याला पकडू नये म्हणून काही जण सोबत हेल्मेट घेऊन प्रवास करतात. मात्र, आता हेल्मेट घातल्यावरही पोलिसांकडून दंड केला जाणार आहे. वाहतुक विभागाच्या हेल्मेटमधील नियमात आता अजून एक नवीन नियम घालण्यात आला आहे की, या नियमांमुळे हेल्मेट सोबत असताना आणि तो जर नीट घातला नसेल तर दोन हजार रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार आपण मोटारसायकल किंवा स्कूटर चालवताना हेल्मेटची स्ट्रीप लावलेली नसेल तर नियम 194D MVA नुसार तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.
यासह तुम्ही BIS मार्क नसलेले हेल्मेट घातले असेल तर याच नियमानुसार तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. अशा प्रकारे नियमाचे पालन न केल्यास याच नियमांतर्गत तुम्हाला दोन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.