मनोरंजन

मोठी बातमी! शिजानखान सोबतच्या प्रेमसंबंधातून तुनिषाची आत्महत्या; आईची तक्रार

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मानं शूटींगदरम्यान सेटवरच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं कलाक्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
तुनिशाचं नायगाव येथे शूटिंग सुरू होते. सेटवर असलेल्या मेकअप रूममध्ये तिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. मेकअप रूममधून तुनिशा खूप वेळ बाहेर न आल्यानं तिच्या सहकाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, अशी माहिती समोर आली आहे.
सेटवरील लोकांनी तिला दवाखान्यातही नेलं होतं. परंतु डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केलं. दरम्यान, तिच्यासोबत काम करणारा शिजान खानसोबत तिचे प्रेमसंबंध होते. त्या नैराश्यातून तिने हे पाऊल उचलले आहे. शिजानला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, असे सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरुन शिजानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास चालू आहे.

Related Articles

Back to top button