सोलापूर

मोठी घोषणा! नव्या वर्षात जंबो शिक्षक भरती

शिक्षक आणि शिक्षकेतर भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. तब्बल ३० हजार पदांची भरती केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. येत्या नव्या शैक्षणिक वर्षात ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची आधार जोड प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर ही भरती केली जाणार आहे.
राज्यात शिक्षक भरती ही रखडली होती. येणाऱ्या नव्या वर्षात राज्याच्या अर्थ खात्याने शिक्षकांच्या ८० टक्के भरतीला मंजुरी दिल्याने पदभरतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे. यातील तब्बल पन्नास टक्के पदे ही तातडीने भरली जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
केसरकर म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांची आधारकार्ड लिंकिंग सुरु आहे. यानंतर विद्यार्थी संख्या ही स्पष्ट होणार आहे. यानंतर ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. आधार लिंक करण्याचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण झाले असून हे काम झाल्यावर ही भरती केली जाणार आहे.

Related Articles

Back to top button