खुशखबर! नोकिया करणार धमाका; स्वस्तात मस्त स्मार्टफोन होणार लाँच

सध्या नोकिया कंपनीच्या स्मार्टफोनची मागणी वाढली आहे. मध्यंतरी या कंपनीचा दबदबा कमी झाला होता. मात्र आता अत्याधुनिक फिचर्ससह नोकिया कंपनी विविध मॉडेलचे स्मार्टफोन लाँच करीत आहे. दरम्यान ही कंपनी याच महिन्यात नोकिया जी-21 मॉडेलचे स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनची किंमत अत्यंत कमी असण्याची शक्यता आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच एलसीडी डिस्प्ले असेल. हा फोन अॅड्रॉईड 11 वर काम करणार आहे. तसेच यामध्ये चार जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मिळेल. या फोनमध्ये एक ट्रिपल रिअल कॅमेरा दिला जाईल. फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेघाफिक्सल असेल.
तर सेल्फी, व्हिडिओसाठी 8 मेघाफिक्सल फ्रंट कॅमेरा असेल. या फोनमध्ये पाच हजार एमएएचची दमदार बॅटरी दिली जाणार आहे. फोनच्या किंमतीबाबत नोकियाने ÷अद्यापपर्यंत कुठलीही माहिती दिली नाही. मात्र या फोनची किंमत तुम्हाला परवडणारे असेल.



