सोलापूर

सिद्धेश्वर कारखाना बचाव ; सोलापुरात उद्या विराट महामोर्चा

कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बचावासाठी सोलापूरकर एकवटले आहेत. इतकेच नव्हे तर सिद्धेश्वर कारखाना बचाव  मोहिमेला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच आता सोमवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता या कारखान्याच्या कार्य स्थळापासून विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे.
यामध्ये विविध पक्षाचे नेते ,कार्यकर्ते, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हा मोर्चा सिद्धेश्वर कारखाना ते होम मैदानापर्यंत काढण्यात येईल.  या कारखान्याच्या चिमणीमुळे विमान सेवेला अडथळा येत नाही, असे वारंवार स्पष्ट झाले आहे. तरी देखील विरोधकांकडून  कारखान्याच्या चिमणीला विरोध केला जात आहे.

त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठीच हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. बोरामणी येथील विमानसेवा सुरू करावी, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी पारदर्शीपणे कारभार करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. मात्र त्यांना राजकीय स्वार्थापोटी विरोध केला जात आहे. उद्या निघणाऱ्या मोर्चेत सोलापूरकरांनी सहभाग व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
     
मोर्चाचा मार्ग, सोमवार दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता स्थळ- श्री सिद्धेश्वर साखर कारखान्यापासून, हत्तुरे वस्ती,  होटगी रोड विमानतळ,  मजरेवाडी, आसरा चौक, होटगी नाका, सात रस्ता, रंग भवन मार्गे  होम मैदान…

Related Articles

Back to top button