सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर बंदला भाजप, शिंदे गट, मनसेचा कडाडून विरोध

सोलापूर बंदबाबत शिंदे गट, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे गटाचे अमोल शिंदे, दिलीप कोल्हे, नाना मस्के, भाजपचे अनंत जाधव, मनसेचे प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर यांची उपस्थिती होती.
अमोल बापू म्हणाले, आपल्या महापुरुषांबाबत कायम आदर आहे, 16 तारखेचा बंद हा मध्यवर्तीच्या नावाखाली केला जातोय, सर्व पक्षीय म्हटले जाते. मात्र आम्हाला बोलावण्यात आले नाही, केवळ आपापल्या नेत्यांना खुश करण्यासाठी हा बंद करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरले जाणार आहे.
आम्ही या बंदमध्ये सहभागी होणार नाही. सर्व व्यवहार सुरळीत चालू राहतील, शाळा सुरू राहतील, अश्या शब्दात अमोल बापू शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान आज पुणे बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. आता सोलापूर बंद कितपत यशस्वी होतो, हे पाहावे लागेल.