मनोरंजन

बॉलिवूडचा ‘भारत कुमार’ काळाच्या पडद्याआड

  • ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन शुक्रवारी झाले. त्यांच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते.
  • मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘मेरे देश की धरती सोने उगला’ आणि ‘भारत की बात सुनाता हूं’ यांसारख्या गाण्यांमधून देशातील आबालवृद्धांत लोकप्रिय झाले. मनोज कुमार यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे 1937 साली झाला होता. मनोज कुमार हे हिंदी चित्रपटांमध्ये देशभक्त अभिनेत्याचा चेहरा म्हणून ओळखले जायचे. भगतसिंग यांच्यावर या अभिनेत्याचा खूप प्रभाव आहे आणि त्यांनी ‘शहीद’ सारख्या देशभक्तीपर चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले.
  • मनोज कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक देशभक्तीपर चित्रपटांमध्ये दिसले. मनोज हे भारतातील एकमेव चित्रपट निर्माता असल्याचे म्हटले जाते, ज्यांनी सरकारविरुद्ध खटला जिंकला.
  • १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले.
  • हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक चित्रपटात ते झळकले. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले.

Related Articles

Back to top button