महाराष्ट्र

ब्रेकिंग! पुण्यात आज बंद : बाजारपेठेत शुकशुकाट

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि विविध सामाजिक संघटनांनी पुण्यात बंद पुकारला आहे. त्यामुळं सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी प्रशासनानं पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. 

पुणेकरांनीही बंदला प्रतिसाद दिला असून अनेक भागांतील दुकानं लोकांनी स्वत:हूनच बंद ठेवली आहेत. दुसरीकडे पुण्यातील नेहमीच्या वर्दळीचा भाग समजल्या जाणाऱ्या अलका टॉकीज चौकात कोश्यारी आणि भाजपविरोधात बॅनरबाजी करत वक्तव्यांचा निषेध करत नेत्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
पुण्यातील एफसी रोड, जंगली महाराज रोड, लक्ष्मी रोड, विद्यापीठ चौक, डेक्कन आणि अलका टॉकीज चौकात बंद पाळण्यात येत आहेत. दुकानं बंद असल्यानं वाहतुकही मंदावली आहे. 

Related Articles

Back to top button