एकच नंबर! रोहितने वन डेत ठोकले पाचशेहून अधिक षटकार
भारत आणि बांगलादेश संघात दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात भारताला पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेश संघाची फंलदाजी सुरु असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा याला झेल पकडताना दुखापत झाली. त्यामुळे भारताच्या फलंदाजीच्यावेळी विराट कोहलीला सलामीसाठी यावे लागले.
रोहित आपल्या क्रिकेट कारकीर्दीत पहिल्यांदा इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि या क्रमांकावर येऊन त्याने 28 चेंडूत 51 धावा केल्या. या डावात त्याने 3 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार मारले. त्याच्या या पाच षटकारांमुळे त्याचे नाव भारताच्या क्रिकेट इतिहासात लिहिले गेले. भारतासाठी पहिल्यांदा पाचशे षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
रोहितने भारतासाठी आणखी एक पराक्रम करुन दाखवला. त्याने भारतासाठी सर्वात आधी पाचशे सिक्स ठोकले. बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यात त्याने 5 सिक्स लगावले होते आणि त्यासोबतच 502 सिक्सही पूर्ण केले. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. त्याच्या नावावर 553 षटकारांची नोंद आहे. 502 षटकारांसह रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे.