राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात अडकतच आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना चप्पल घालून केले अभिवादन केले. त्यामुळे वादंग निर्माण झाला आहे. आता एका मॉडेलने राजभवनावर फोटो शूट केल्याचे समोर आले आहे. मॉडेलनेच हे फोटो शेअर केले आहेत.
कोश्यारी आणि वाद हे समीकरण झाले आहे. गुजराती किंवा राजस्थानी लोक सोडून गेले तर आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची तशी ओळख राहणार नाही, असे त्यांनी वक्तव्य केले होते. त्यासंदर्भात त्यांनी माफी मागितली. सातत्याने केल्या जाणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यभरातून कोश्यारी हटाव, अशी मागणी होऊ लागली आहे.