महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावादवरून वादंग उफाळलेला असातनाच बेळगावातून महाराष्ट्रात लग्नासाठी येणाऱ्या वाहनाला कर्नाटक पोलिसांनी अडवलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून जाणाऱ्या गाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.कन्नड रक्षण वेदिका कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे सीमावाद पेटला आहे.
दोन्ही राज्यातील वातावरण तापलं असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय, असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितींचा विचार करता कायदा-सुव्यवस्था राखण्याकरता दोन्ही राज्यांच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन्ही राज्यांनी आपली परिवहन सेवा खंडीत केली असून केवळ खासगी वाहने या मार्गांवर जात आहेत. मात्र, या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
बेळगावातून महाराष्ट्रात लग्नासाठी येणाऱ्या वाहनालाही अडवण्यात आलं आहे. त्यांना पुढे सोडण्यात येत नसल्याने वाहनात बसलेल्या प्रवाशांना रडू कोसळले. कर्नाटक पोलिसांनी हस्तक्षेप करत वाहतूक सुरळीत केली आहे. काही वाहनांना कर्नाटकची सीमा ओलांडेपर्यंत सुरक्षा पुवण्यात येत आहे.