सोलापूर
जुळ्या बहिणींशी लग्न केल्याने नवरदेव अडचणीत

- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे एका लग्नाची गोष्ट सर्वांनीच पाहिली. आय टी इंजिनिअर असलेल्या जुळ्या बहिणींनी एकाच तरुणासोबत लग्न केल्याची बातमी काल तुफान व्हायरल झाली. मात्र, जुळ्या बहिणींशी लग्न करणे संबंधित नवरदेवाच्या अंगलट आले आहे. अतुल अवताडे असं या नवरदेवाचं नाव असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या ४९४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुळ्या बहिणींशी लग्न बेकायदा असल्याचं सांगत माळेवाडीतील राहुल फुले याने अतुलविरोधात फिर्याद दिली होती. याप्रकरणी अकलूज पोलिसांनी अतुलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कांदिवली येथील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी असून त्यांनी माळशिरस तालुक्यातील मूळचा असणारा तसेच मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणाऱ्या अतुल बरोबर त्यांनी लग्न केले. पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. त्याना लहाणपणापासून एकमेकींची सवय आहे. त्या दोघीही एकमेकांपासून दूर राहू शकत नसल्याने त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दोघींच्या वडिलांचे निधन झाले आहे. काही महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी होती. अतुलने त्याच्या टॅक्सीतून त्यांना रुग्णालयात भरती केले. एवढेच नाही तर त्यांची त्याने काळजी देखील घेतली. यातून पिंकीला यातून आवडू लागला. त्यांचे सूत जुळले. त्या दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या वेगळं होऊन राहू शकत नव्हत्या. - त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. रिंकी आणि पिंकी या दोघीही इंजिनियर असून त्या जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचे शिक्षण एकत्रित झाले. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला लागल्या. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत लग्न केले.