महाराष्ट्र

ब्रेकिंग! ठाकरेंच्या सेनेकडून फडणवीसांचे अभिनंदन

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. मागच्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा धबधबा वाहत होता. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याचे राजकारण कुजले. आर्थिक बेशिस्तीने टोक गाठले. परिणामी, राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्याबद्दल ठाकरे गटाने त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नसल्याचा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. ‘सामना’ मुखपत्रातील अग्रलेखातून आज त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
  • फडणवीस यांनी राज्यकारभारात शिस्त आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. मागच्या तीन वर्षांत भ्रष्टाचाराचा धबधबा वाहत होता. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्याचे राजकारण कुजले. आर्थिक बेशिस्तीने टोक गाठले. आमदार, खासदार, नगरसेवक, खऱ्या शिवसेनेचे पदाधिकारी यांना विकत घेण्यासाठी व नंतर पोसण्यासाठी लागणारा पैसा रस्ते, बांधकाम ठेकेदार, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, म्हाडा, एसआरए, नगरविकास खात्याची लूट करूनच जमा केला गेला, असा आरोपही ठाकरेंनी केला आहे. 
  • राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले. हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही. कारण पिकावरचा दाढीवाला खोडकिडा म्हणतोय, मला हलक्यात घेऊ नका. फिक्सरांनी मारलेला सिक्सर अडवावा लागेल, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button