क्राईम

कुठे चाललीये ताई म्हणाला अन् शिवशाही बसकडे घेऊन गेला

  • पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे, शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. पीडित तरूणीला पुढील उपचारांसाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरूणी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात पुण्याहून फलटणकडे जाण्यासाठी आली होती. त्यावेळी संबंधित तरूणी फलाट क्रमांक 22 वर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये जाऊन बसली. त्यावेळी आरोपीने तरूणीला बाजूला उभी असलेली बस फलटणला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडित तरूणी बाजूला उभ्या असलेल्या बसमध्ये जाऊन बसली. 
  • त्याचवेळी बसमधील लाईट बंद होते. याचाच फायदा घेत आरोपीने तरूणीवर अतिप्रसंग केला. पोलीस सध्या या नराधमाचा शोध घेत असून पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून दत्तात्रय रामदास गाडे (रा. शिक्रापूर) असे या नराधमाचे नाव असून त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामीनावर बाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

Back to top button