हिंदू मुलांनीही अनेक मुलींच्या हत्या केल्या आहेत ; संजय राऊत

Admin
1 Min Read

देशभरात श्रद्धा वालकर या तरुणीचा तिच्याच प्रियकराने तिच्या देहाचे ३५ तुकडे करून केलेल्या निर्घृण हत्येवरून ‘लव्ह जिहाद’ हा मुद्दा चर्चिला जात आहे.
याबाबत हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे. महाराष्ट्रातही त्याविरोधात मोर्चे निघताय. नाशिक शहरातही हजारोंचा मोर्चा निघाला. आज त्र्यंबकेश्वर येथेही मोर्चा काढण्यात आला.

याबाबत वातावरण पेटलेले असताना शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राऊत म्हणाले, मुळात आफताब आणि श्रद्धाचा जो विषय आहे तो अत्यंत निर्घृण आहे.
अनेक मुलींच्या हत्या हिंदू मुलांकडूनही झालेल्या आहेत. धमक्या देण्यात आलेल्या आहेत. मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. यात जात आणि धर्म न आणता या देशातील प्रत्येक मुलीच रक्षण व्हायला पाहिजे, ही भूमिका असायला हवी.
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात ‘लव्ह जिहाद’ बाबत हिंदू संघटनांच्या भावना तीव्र असताना थेट हिंदू तरुणांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्याने राऊत यांच्या या भूमिकेवर हिंदु संघटना काय भूमिका घेतात, हे बघणे महत्वाचे असेल.

Share This Article