खेळ

टीम इंडिया आता बांगलादेश दौऱ्यावर

तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम बांगलादेशत दाखल होत आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, के एल राहुल या दौऱ्यात टीम इंडियामध्ये पुनरागमन करत आहेत. 

या तिघांनी न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळलेले शिखर धवन व वॉशिंगटन सुंदर शुक्रवारी भारतीय टीममध्ये सामील होतील.
भारत आणि बांगलादेशमध्ये अनुक्रमे ४, ७ आणि १० डिसेंबरला पहिला, दुसरा व तिसरा वनडे सामना खेळला जाईल. त्यानंतर १४ डिसेंबरपासून पहिला तर २२ डिसेंबरपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाईल. बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय व कसोटी मालिकेसाठी संघाचे नेतृत्व रोहितकडे सोपवण्यात आले आहे. तर वनडे सीरीजसाठी बांगलादेश संघाचे नेतृत्व तमीम इकबाल करताना दिसेल.

Related Articles

Back to top button