राजकीय

गुजरातमध्ये भाजपच विजयी होईल, पण…

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. यामुळे गुजरातसह अन्य राज्यातही त्याचे पडसाद दिसणार आहेत. 

दरम्यान यावर ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत भाजप विजयी होईल, पण त्यांना अत्यंत कमी बहुमत मिळेल, असे राऊत म्हणाले.
यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे अजिबात वाटत नाही. मंत्रिमंडळविस्ताराच्या केवळ अफवा पसरवल्या जात आहे. गद्दारांना आपल्या गटात थांबविण्यासाठी या बातम्या पेरल्या जात आहे. विस्तार करू म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आमिषे दाखविली जातात. पण प्रत्यक्षात विस्तार होणार नाही, असा दावा राऊत यांनी केला.

Related Articles

Back to top button