शरद पवारांनी कधीही शिवरायांचे नाव घेतले नाही, त्यांची सर्व भाषणे ऐकून बघा

Admin
1 Min Read

राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून फंडिग गोळा करण्यात आले. 1999 पासून हे विष राज्यात कालवले गेले, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.

राज हे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादीवर जहरी टीका केली. सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे, ते जातीच्या राजकारणासाठी सुरू आहे. याआधी जन्माला आलेल्या लोकांना इतिहास माहीत नसेल का, त्यांनी काय वाचलं नव्हतं. यांनाच आता इतिहास कळायला लागला. यांनाच आता स्वाभिमान जागरूक झाला. हे सगळे राष्ट्रावादीपासून सुरू झाले आहे. राष्ट्रावादीच्या जन्मापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत, असे राज यांनी म्हटले.

Share This Article