जडेजाने शेअर केला बाळासाहेबांचा तो व्हिडिओ, म्हणाला…

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. यासाठी भाजप, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षानंही आपले दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. रिवाबाला भाजपकडून जामनगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं मतदानाच्या पूर्वसंध्येला जडेजानं मोदींबाबत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
जडेजानं ठाकरेंचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात ठाकरेंनी मोदी गेला तर गुजरात गेला, असं वक्तव्य केलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अजूनही वेळ आहे, हे गुजरातच्या लोकांना कळायला हवं, असं जडेजानं म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जडेजा पत्नी रिवाबाला जामनगरमधून विजयासाठी लोकांना मतदान करण्याचं आवाहन करत आहे.



