खेळ
आयपीएलमध्ये मोठा राडा

- यंदाच्या आयपीएल हंगामातील काल खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ आमने-सामने होते. या सामन्यात हैदराबादचा विस्फोटक डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तुफानी शैलीत फलंदाजी करून चाहत्यांची मने जिंकली. अभिषेकने आक्रमक अंदाजात 59 धावांची खेळी केली. पण अभिषेक बाद झाल्यावर त्याचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीशी वाद झाला.
- दिग्वेश राठीचे नोटबुक सेलिब्रेशन अभिषेकला सहन झाले नाही. प्रत्यक्षात, राठीने नोटबुकचा आनंद साजरा करताना अभिषेकला हाताने “आउट” होण्याचा इशारा केला, ज्यामुळे तो रागावला आणि त्याच्याशी वाद घालताना दिसला. अभिषेक आणि विघ्नेश यांच्यात मैदानामध्ये राडा होत असतानाच दोन्ही अंपायर आणि लखनऊचे इतर खेळाडू मध्ये पडले आणि त्यांनी भांडण शांत केले. अभिषेक शर्मा संतापलेला असताना विघ्नेशनेही त्याला प्रत्युत्तर दिले, त्यामुळे काही काळ मैदानामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



