महाराष्ट्र
गौतमी पाटीलच्या डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडू

अभिनेत्री गौतमी पाटील हिच्या विकृत डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील, अशा शब्दांत मनसेने इशारा दिला आहे. गौतमीच्या लावणीवरून मनसेने जालन्यातील सेवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गौतमी हिच्या अश्लिल हावभावामुळे समाजातील वातावरण दूषित झाल्याचा आरोपही मनसेने केला आहे.
गौतमीच्या लावणीवरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेकांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यामध्ये आता मनसेने उडी मारली आहे. गौतमीच्या विकृत डान्सवर आवर घाला, अन्यथा गृहमंत्रालयाच्या कार्यालयाच्या काचा फोडण्यात येतील, असा इशारा देत जालन्यातल्या सेवली पोलिसात मनसेने तक्रार दाखल केली.
मनसेच्या सिद्धेश्वर जनार्धन काकडे या तरुण मनसे कार्यकर्त्याने इशारा दिला आहे. तसेच, हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे अनेक कलाकार संस्कृती जपून आपला डान्स सादर करत असतात. मात्र गौतमी ही हेतू पुरस्कर अश्लिल हावभाव दाखवत डान्स करत आहे. त्यामुळे समाजातील वातावरण दूषित होत चालले आहे, असेही त्याने म्हटले.



