महाराष्ट्र
माफी मागा, नाही तर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेची राज्यपालांवर जहरी टीका

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चांगलेच अडचणीत सापडले आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातूनही राज्यपालांवर टीका करण्यात आली आहे.यासोबत शिंदे गट आणि भाजपवरही निशाणा साधला आहे. शिवरायांचा अपमान करणार्यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल, असे शिवसेनेने म्हटले आहे. वीर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून ‘माफीवीर’ असा उल्लेख झाला.
महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजप व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले.
त्यांनी शिवसेना आता काय करणार? असे विचारून राहुल यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे.