काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आलेले असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून मुद्दा छेडला. सावरकर यांच्याविरोधात वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेने राहुल गांधींच्या वक्तव्याला विरोध केला तर भाजपने राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात निषेध केला आहे.
दरम्यान महात्मा गांधी यांचे पणतु तुषार गांधी यांनी आणखी एक वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला सावरकरांनी मदत केली असल्याचा दावा तुषार यांनी केला आहे. त्यांनी काल रात्री याबाबत ट्विट केले आहे.
ते ट्विटमध्ये म्हणतात की, सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतेही शस्त्र नव्हते.