आभाळ फाटलं! हवामान खाते जे सांगतयं तेच घडतयं

Admin
1 Min Read
  • राज्यातील अनेक भागात पावसाने अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून देशाचे माजी कृषिमंत्री म्हणून पद भूषविलेले शरद पवारही बरसणारा पाऊस पाहून चिंतेत पडले आहेत.
  • शेतकऱ्यांना मदत करणे ही केंद्र सरकार व राज्य सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारने केंद्राच्या योजनेतून शेतकऱ्यांसाठी मदत करावी, अशी पवारांनी केली आहे. पुढचे चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून हवामान खात्याने ज्या पद्धतीने अंदाज वर्तवले आहे. तसेच घडत असल्याचे पवार म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
  • पवार म्हणाले की, दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते, अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. आपण दुष्काळ पाहिला. पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृ्ष्टी होत आहे. त्यात सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक वाहून गेले तर त्या वर्षीचे नुकसान होते. पण जमीन वाहून गेली, तर त्या जमिनीची उत्पादकता कायमची कमी होते. त्यामुळे फक्त पिकांसाठी मदत करून चालणार नाही. जमिनीसाठीही मदत करावी लागेल.
Share This Article