महाराष्ट्र

ब्रेकिंग! मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मोठा ट्विस्ट

  • मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना अभ्यासकांशी चर्चा केली. आम्ही कोणतेही कागदपत्र देणार नाही.
  • सरकारने 13 महिन्यांपूर्वी कागदपत्र घेतली. सातारा संस्थानचे आणि हैदराबाद संस्थानचे गॅझेटियरमध्ये संपूर्ण मराठवाडा बसतो, असे ते म्हणाले.
  • त्याचबरोबर सातारा संस्थानाचे गाझेटियर मराठवाड्यातला मराठा कुणबी असल्याचं सांगतो आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारला अडथळा असणे शक्य नाही. 58 लाख नोंदी आहेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, ज्यांच्या नाही सापडल्या त्यांची पोट जात घ्या आणि अध्यादेश काढा, असेही जरांगे म्हणाले. कुणबी ही उपजात आहे हेच कायदा सांगतो. ओबीसी पात्र करायचं असेल तर पोटजात उपजात म्हणून मराठा कुणबी म्हणून घ्या. सरसकट म्हणायची गरज नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles

Back to top button