क्राईम
ब्रेकिंग! पुण्यात भीषण दुर्घटना

- पुण्यात कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला आज अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. या भीषण आगीत संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे. अद्याप आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
- ही दुर्घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. कामगारांना वाहतूक करणाऱ्या या टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये अचानक आग लागली. आगीने काही क्षणांतच संपूर्ण वाहनाला घेरले आणि प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
- या आगीत ट्रॅव्हल्सचा सांगाडा शिल्लक राहिला असून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. मात्र, ट्रॅव्हल्सचा दरवाजा आतून लॉक झाल्याने प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. परिणामी चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.



