देश - विदेश

बिग ब्रेकिंग! इराणने 36 तासात अमेरिकेचा घेतला बदला

  • इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. याबाबत इराणच्या वृत्तसंस्थेनेकडून माहिती देण्यात आली आहे.
  • अमेरिकेने शनिवारी रात्री इराणच्या तीन अणु तळांवर हल्ला केला होता. याला प्रत्युत्तर देत आता इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे.
  • इराणच्या मेहर न्यूज एजन्सीनुसार, इराणने अमेरिकेला योग्य उत्तर दिले आहे. इराणने सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळाला टार्गेट केले आहे. इराणकडून हा तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला असल्याची माहिती महेर न्यूज एजन्सीकडून देण्यात आली आहे. इराणचे राजदूत अमीर साई इरावनी म्हणाले की, अमेरिका आपले जे काही नुकसान करेल, तेच नुकसान त्याचेही होईल. इराण योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे.
  • शनिवारी रात्री अमेरिकेने इराणच्या नतान्झ, इस्फहान आणि फोर्डो अणु तळांवर बी-2 बॉम्बरने हल्ला केला होता. याबाबत माहिती देताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुस्थळावर हल्ला केला असल्याचा दावा केला होता.

Related Articles

Back to top button