खेळ
पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं ‘जलेबी बेबी’ गाणं

- आशिया चषकात भारताविरुद्धच्या प्रतिष्ठेच्या लढतीत उतरण्यापूर्वीच पाकिस्तानला मोठा लाजिरवाणा अनुभव आला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला पाकिस्तान संघ सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरला तेव्हा डीजेच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. स्टेडियममध्ये प्रथम पाकिस्तानचे राष्ट्रगीत आणि नंतर भारताचे राष्ट्रगीत वाजवले जाईल अशी घोषणा करण्यात आली होती.
- पाकिस्तानी खेळाडू राष्ट्रगीत गायला तयार असताना स्टेडियमच्या लाऊडस्पीकरवर ‘जलेबी बेबी’ हे अल्बम गाणे वाजू लागले. हे ऐकून पाकिस्तानी खेळाडू चकित झाले. काही सेकंद हे गाणे वाजले असले तरी या घटनेमुळे पाकिस्तान आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. लगेचच चूक लक्षात आल्यावर आयोजकांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवले.
- सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला २० षटकांत ९ गडी बाद १२७ धावाच करता आल्या. अखेर उत्कृष्ट फलंदाजी करत भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने हरवले.



