- सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यावर एका अनोळखी (अंदाजे वय ४० वर्षे) इसमाने नग्न अवस्थेत चढून गोंधळ घातला. त्यास खाली उतरवताना मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
- फिर्यादी पो.कॉ. अतुल लक्ष्मण रिकीबे (फौजदार चावडी पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरज सुरेश सुरवसे (रा. मराठा वस्ती, भवानी पेठ) याने लाकडाने मारहाण केली तर आरोपी प्रशांत दत्तात्रय मरगणे (रा. अवंती नगर, सोलापूर) याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे इसम खाली पडून गंभीर जखमी झाला आणि जागीच मरण पावला. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोलापूर ब्रेकिंग! छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्यावर अनोळखी इसमाचा नग्न अवस्थेत गोंधळ
