मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेली पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु केले होते. दरम्यान आज सरकारने जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सोडवलं आहे. आता जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या या शिष्टाईचे श्रेय त्यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहेत. मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
जरांगे यांनी किती शिव्या दिल्या तरी उपोषण सोडले याचा मला आनंद आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने आज मराठा समाजाच्या हितासाठी चांगला तोडगा काढला याचाही मला आनंद आहे. जरांगे यांचे उपोषण आता संपलेले आहे. खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनच तयारी होती. पण जरांगे यांची सरसकट कुणबी प्रमाणत्र द्यावे या मागणीला कायदेशीर अडचणी होत्या. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य नव्हते, अशी पहिली प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.