महाराष्ट्र

ब्रेकिंग! दुष्काळी भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, भयंकर रौद्रावतार

  1. महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनने कोकणात दमदार प्रवेश केला असून, त्यामुळे मुंबई, पुणे, सोलापूर, कोकण आणि राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
  2. सध्या कोकणासह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर अशा अनेक भागांत पावसाने आगमन केले आहे. हवामान विभागानुसार, पुढील चार ते पाच दिवस कोकणासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये आणि पुणे जिल्ह्यात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

Related Articles

Back to top button