राजकीय
गोंधळात गोंधळ : राज्यात कुठे मैत्रीपूर्ण लढत, कुठे बंडखोरी

- सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीत अनेक मतदारसंघात उमेदवारीवरुन वाद पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनीदेखील एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.
- महाविकास आघाडीमध्ये ज्या ठिकाणी दोन पक्षांनी अर्ज भरले आहेत. असे मतदारसंघ राज्यभरात पाहायला मिळत आहेत. त्यातील काही प्रमुख मतदारसंघाची नावे समोर आली आहेत. त्यामुळे नेमकं या ठिकाणी काय होणार हे माघारी अर्ज घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
- महाविकास आघाडीतील मैत्रीपूर्ण लढती-
- मिरज विधानसभा
- ठाकरे गट -तानाजी सातपुते
- काँग्रेस – मोहन वनखंडे
- सांगोला विधानसभा
- ठाकरे गट -दीपक आबा साळुंखे
- शेकाप – बाबासाहेब देशमुख
- दक्षिण सोलापूर विधानसभा
- काँग्रेस – दिलीप माने
- ठाकरे गट – अमर पाटील
- पंढरपूर विधानसभा
- काँग्रेस -भागीरथ भालके
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -अनिल सावंत
- परांडा विधानसभा
- ठाकरे गट -रणजीत पाटील
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे
- दिग्रस विधानसभा
- ठाकरे गट – पवन जैस्वाल
- काँग्रेस -माणिकराव ठाकरे



