ब्रेकिंग! सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ला

पुण्यात आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील फुरसुंगीमधील द्वारकाधीश गोशाळेत हा प्रकार घडला. खोत यांनी गोरक्षकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर खोत यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
एका वाहिनीच्या कार्यक्रमात खोत हे गोरक्षकांविरोधात भूमिका मांडत होते. त्याचवेळी कार्यक्रमात घुसून गोरक्षकांनी खोत यांच्यावर हल्ला चढवला. तिथे हजर असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.
गेल्या काही दिवसांपासून खोत हे गोरक्षकांविरोधात आवाज उठवित आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून कथित गोरक्षकांना आव्हान देत आहेत. हीच गोष्ट गोरक्षकांना खटकल्याने त्यांनी पुण्यात खोत यांच्यावर हल्ला चढवला. जर सत्ताधारी पक्षातील आमदारावर हल्ला होत असेल तर कायदा सुव्यवस्था राहिलीये कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे.



