महाराष्ट्र

ब्रेकिंग! मनोज जरांगेंचा बीडमधून सरकारला इशारा, मला दगडफेक, जाळपोळ मान्य नाही, पण…

  • मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडमधील सभेतून मराठा समाजाला महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. आता दुसऱ्यांच्या इशाऱ्यावर चालण्याऐवजी स्वतःच्या बुद्धीने विचार करून निर्णय घ्या, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मुंबईला शांततेत जाऊन आपले मराठा आरक्षणाचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
  • बीडमध्ये झालेल्या या सभेत जरांगे यांनी काही कठोर भूमिका मांडल्या. त्यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजावर आलेले संकट शांततेच्या मार्गाने दूर केले जाईल. मला दगडफेक, जाळपोळ मान्य नाही. सभेमध्ये डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादावर त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, आज आमच्या सभेला डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कोणाच्याही सभेला डीजे वाजणार नाही. सत्ता कायम नसते, ती बदलत असते, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, असा थेट इशाराही त्यांनी दिला. ही शेवटची लढाई असून, ती आरक्षणाशिवाय थांबणार नाही, असेही जरांगे म्हणाले.

Related Articles

Back to top button