सोलापूर ब्रेकिंग! तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभ येथे झाडाच्या फांदया कापताना तोल गेला

Admin
2 Min Read
  • सोलापूर : महापालिका उद्यान विभागातील कायम कामगार प्रभूराज धुळप्पा कलशेट्टी हे झाडाच्या फांदया कापत असताना तोल गेल्याने झाडावरून जमिनीवरील फरशीवर पडून मृत्यूमुखी पडले.
  •  ते महापालिका उद्यान विभागात माळी या पदावर कार्यरत होते. ते मूकबधिर होते. तुळजापूर वेस येथील हुतात्मा स्तंभ येथील उद्यानाची देखभालीस कार्यरत होते. आज सकाळी हुतात्मा स्तंभ येथे झाडाच्या फांदया अस्ताव्यस्त वाढल्याने ते कापायला झाडावर चढले. फांदया कापत असताना तोल जाऊन हुतात्मा स्तंभ येथील जमिनीवरील फरशीवर पडले. तेंव्हा डोक्यास मार लागून रक्तस्त्राव सुरु झाला. तेथील नागरिकांनी त्यांना ताबडतोब मार्कडेय रुग्णालय येथे दाखल केले. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने अखेर सांयंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. 
  •  त्यांचे वय 52 वर्ष होते. ते भवानी पेठ येथे राहत होते. त्यांनी यापूर्वी प्राणी संग्रहालय, रूपाभवानी उद्यान येथेही सेवा बजावली. त्यांच्या पश्च्यात पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कलशेट्टी कुटुंबंच उघड्यावर आला आहे. कलशेट्टी कुटुंबीय व त्यांचे नातलग धाय मोकलून आक्रोश करत रडत होते. ते कर्तव्य बजावत असताना मरण पावल्याने त्यांना तातडीची मदत व अनुकंपा तत्वावर त्यांच्या मुलांना महापालिका सेवेत घेण्याची मागणी तेथे उपस्थित नागरिक करत होते.
  • यावेळी आ. विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पुढील कार्यवाही करण्याची हमी दिली. त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक शिवानंद पाटील, बाळासाहेब आळसंदे उपस्थित होते.
Share This Article