क्राईम

पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करुन खून

  • एका नराधमाने पाच वर्षांच्या छोट्या मुलीवर बलात्कार करुन तिची निदर्यतेने हत्या केली. ही संतापजनक घटना कर्नाटकच्या हुबळीमध्ये घडली आहे. आरोपी बिहारी मजूर होता. आरोपीचे नाव रितेश कुमार होते. 35 वर्षाचा रितेश कुमार बिहारचा राहणारा होता. पीडित मुलगी तिच्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी रितेश कुमारची वाईट नजर तिच्यावर पडली. त्याने आपला मनातला घाणेरडा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मुलीला पकडले व तिला एका शेडमध्ये घेऊन गेला.
  • मुलगी रडत होती, आरडा-ओरडा करत होती. मुलीच्या ओरडण्याच्या आवाज ऐकून लोक तिथे पोहोचले. पण तोपर्यंत आरोपी रितेशने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. लोक पोहोचेपर्यंत रितेश तिथून पळून गेला. मुलगी घरासमोर खेळत असताना रितेश तिला पकडून शेडमध्ये घेऊन गेला. हे सगळ तिथल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले. आरोपी रितेश विरोधात पॉक्सो कायद्यातंर्गत हत्या, पोलिसांवर हल्ला आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला.
  • पोलिसांनी रितेशला पकडले. त्यानंतर त्याची काही कागदपत्र घेण्यासाठी आणि त्याची ओळख पटवण्यासाठी त्याला त्याच्या घरी नेले. त्यावेळी रितेशने पोलिसांवर दगडफेक केली व पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्त शशी कुमार म्हणाले की, रितेशने त्याची ओळख पटू नये यासाठी तो सर्व कागदपत्र देत नव्हता व ओळख लपवण्याचा प्रयत्न केला.
  • रितेशने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आमच्या महिला अधिकारी, सब-इंस्पेक्टर अन्नपूर्णाने रितेशला इशारा देण्यासाठी हवेत गोळीबार केला. पण त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर दोन-तीन राऊंड फायर केले. यात एक गोळी त्याच्या पायात, दुसरी पाठीत लागली. रितेशला लगेच रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Related Articles

Back to top button