क्राईम

वेश बदलून बहिणीकडे गेली, तब्बल दीड कोटींचे दागिने केले गायब

  • शेअर बाजारात हरल्यामुळे घरातील गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी एका तरुणीने तिच्याच सख्ख्या बहिणीच्या सासरी चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी दीड कोटींचे दागिने अवघ्या बारा तासाच्या आत जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
  • ओधवजी खिमजी भानुशाली, 66 वर्षे हे घरात एकटेच असताना एक दाढीवाला पुरुष कच्ची भाषेत बोलून मला रूम हवी आहे मला मदत करा, असे सांगून घरात घुसला. त्याने आपल्या गावाकडचा असल्याने त्याला घरात घेतले आणि गजरा समाजाच्या विषयी बोलल्यामुळे आपुलकी अजून वाढली आणि त्या चोरट्याने वॉशरूममध्ये जायचे असे सांगून वॉशरूममध्ये गेला आणि तुमचे बाथरूम लिकेज झाला आहे, असे सांगून दाखवण्यासाठी नेऊन त्याच बाथरूममध्ये ढकलून त्यांना कोंडून ठेवले आणि घरातील मौल्यवान वस्तू दागिने घेऊन लंपास झाला.
  • नालासोपारा मध्यवर्ती गुन्हे शाखेने आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले असता, त्या सीसीटीव्हीमध्ये बॅगा हातात घेऊन जाताना कॅप घातलेला पुरुषाचा वेश धारण केलेला इसम दिसला. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी एका झुडपामध्ये बॅगा लपवून त्या ठिकाणी पुन्हा एका महिलेने येऊन त्या बॅगा घेऊन गेल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्या सीसीटीव्हीचा माग घेता घेता पोलीस गुजरातच्या नवसारी येथे पोहोचले आणि महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे दीड कोटींचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. पुरुषाचा वेश धारण करण्यासाठी तिने इंस्टाग्राम वरील मिम्स पाहल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button