राजकीय
ब्रेकिंग! ठाकरे गटात भूकंप, फायरब्रँड नेत्या नेत्या करणार जय महाराष्ट्र

- ठाकरे गटाला शिंदे गटाने पुन्हा एकदा धक्का दिला. जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत अनवाणी राहणार अशी शपथ घेणाऱ्या शिवसेना उपनेत्या आणि महिला विभाग संघटक राजुल पटेल ह्या शिवबंधन तोडणार आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना उपनेत्या राजुल पटेल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्याआधीच ठाकरे गटाला एकानंतर एक धक्के बसू लागले आहेत.
- सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी आणि पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. पण दुसऱ्या बाजुला त्यांना एकानंतर एक धक्के बसत आहेत.
- छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली नसल्याने पटेल ह्या नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी शिवबंधन तोडत हाती धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पटेल ह्या ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या आहेत. पटेल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणे ही बाब ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.



