ब्रेकिंग! ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट

भारतीय यष्टिरक्षक ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाला आहे. या अपघातानंतर ऋषभवर डेहराडूमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता पुढील उपचारांसाठी पंतला मुंबईत आणण्यात येणार आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) हा निर्णय घेतला आहे. डीडीसीए ऋषभला उपचारासाठी मुंबईला घेऊन जाणार असून, त्याच्या लिगामेंटच्या दुखापतीवर उपचार केले जाणार आहेत.
ऋषभला पुढील उपचारांसाठी आज मुंबईला हलवण्यात येणार आहे. 30 डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर ऋषभ याच्यावर डेहराडूनमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती डीडीसीएचे संचालक श्याम शर्मा यांनी दिली.
ऋषभच्या डोक्यात दोन कट असल्याची माहिती बीसीसीआयने दिली होती. त्याच्या उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीवर जखम आहे. ऋषभची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. मात्र, आता बीसीसीआय आणि डीडीसीएने त्याच्यावर चांगले उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.



