क्राईम

दोन महिन्यांपूर्वी घर बदलले, पहाटे भयंकर घडले

  1. राज्यातील खुशाल भदाणे या तरुणाने कौटुंबिक वादातून पत्नी प्रियंका भदाणे हिची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा तरुण इथवरच थांबला नाही तर पत्नीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतः आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. दरम्यान पत्नीच्या आक्रोशामुळे ग्रामस्थांनी भदाणेच्या घराच्या दिशेला धाव घेतली होती. त्यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचा जीव वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले.
  2. मात्र पत्नीचा गळा चिरल्याने प्रियंका या महिलेचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
  3. या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून महिलेचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवला असून हत्या करणारा तरुण खुशाल याला ताब्यात घेतले आहे.
  4. खुशाल आणि प्रियंका हे पती-पत्नी मूळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील निंभोरा या गावातील रहिवासी होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते जारगाव येथे वास्तव्यास आले होते. खुशाल हा तरुण मिस्त्रीचे काम करत करायचा. मात्र पती-पत्नीमध्ये कायम वाद होत होते.
  5. चारित्राच्या संशयावरून हा वाद असल्याने स्वत:चे गाव सोडून ते दोन महिन्यांपूर्वी जारगावमध्ये राहायला आले होते आणि याच संशयावरून खुशालने प्रियंकाची गळा चिरून हत्या करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

Related Articles

Back to top button