क्राईम
नागपुरात दंगलीचा ‘काश्मीर पॅटर्न’

- नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपींविरोधात कारवाईचा फास आवळणार आहे. नागपूर पोलिसांसोबतच दहशतवाद विरोधी पथकाने नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने असामाजिक तत्व काही वर्षांपूर्वी दगडफेक करायचे, तशाच प्रकारची दगडफेक नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी झाली होती. दरम्यान राष्ट्रीय तपास संस्था या तपासात सामील होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- सोमवारी संध्याकाळी हिंसाचार उसळलेल्या हिसांचारातील ‘काश्मीर पॅटर्न’ दगडफेकीची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने समांतर चौकशी सुरू केली आहे. महाल परिसरातल्या हिंसाचाराची घटना ही एका सुनियोजित कटाचा भाग होता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जर हा एका सुनियोजित कटाचा भाग असेल तर या कटासाठी कुठल्या दहशतवादी संघटनेने पैशाची उपलब्धता केली आहे का? याचाही तपास एटीएस आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा करणार आहे.
- पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या वाहनांवर पेट्रोल बॉम्ब फेकले गेले, ही बाब चिंताजनक आहे. हे बॉम्ब कसे वापरले गेले याची चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दंगेखोरांना कुणाचे पाठबळ होते का? याची देखील चौकशी पोलीस करणार आहेत.



