राजकीय

ठाकरेंसोबतच्या बैठकीवर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

  • आम्हाला तिकडे येण्याला स्कोप नाही पण तुम्हाला इकडे स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी ऑफर दिली होती. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभाप्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
  • त्यानंतर काल फडणवीस आणि उद्धव यांच्यामध्ये एक बैठक झाली. या बैठकीला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या बैठकीमध्ये हिंदी भाषा सक्ती, भाषा त्रिसूत्र आणि विरोधी पक्षनेतेपद यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात ही बैठक झाली.
  • या बैठकीची चर्चा सुरू असतानाच आता फडणवीस यांनी या बैठकीवर विधानसभेत प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला, ठाकरेंनी काल दिलेले पुस्तक मी वाचले. कुणी कुणाला भेटले म्हणजे युतीसाठी भेटले असे होत नाही, असे फडणवीस यांनी या बैठकीबाबत बोलताना सांगितले. दरम्यान पहिली ते बारावी हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरेंच्या कॅबिनेटसमोर आला होता, ठाकरेंच्या कॅबिनेटने अहवाल स्विकारला होता, असा दावाही फडणवीस यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button