ब्रेकिंग! सार्वजनिक गणेशात्सव मंडळांना खुशखबर

Admin
2 Min Read
  • सोलापूर :- राज्य शासनाच्या पु.ल. देशपांडे कला अकादमी , सांस्कृतिक कार्यविभाग यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशात्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेचा अर्प पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पार्टलव्दारेच दि. 20 जुलै 2025 पासून दि. 20 ऑगस्ट  पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
  • सदर स्पर्धा नि:शुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतिचे जतन व संवर्धन या करीता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे याविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्य, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेश भक्तांसाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच सामाजाभिमुख उपक्रम अधिकाअधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल. 
  • 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशात्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे हे चार जिल्हे प्रत्येकी 3 आणि 4 जिल्हे वगळता अन्य 32 अशा प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकुण 44 शिफारसी राज्यस्तरीय परिक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सर्वांनी आपपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अपूर्ण अर्ज रद्द ठरविण्यात येतील.
  • राज्स्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख, एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना 25 हजार रू. पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाअधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड . आशिष शेलार यांनी केले आहे.
Share This Article